ग्रुप ग्रामपंचायत अबिटघर
ग्रामपंचायत अबिटघर.तशी अबिटघर आणि बावली हे दोन महसूल गाव तसेच साठेपाडा,मोरघेपाडा, अभनपाडा,मनाचापाडा, पळसपाडा,पाटिलपाडा, मान,मोठी बावली,धाकटी बावली,वैतागवाडी तसेच अनेक वाड्या व वस्त्या मिळून तयार झालेली एक मोठी ग्रामपंचायत आहे.
महत्वाचे म्हणजे अबिटघर ग्रामपंचायत ही सरपंच सौ. साक्षी संतोष साठे यांच्या नेतृत्वाखाली काम करत असतानाच ISO 9001:2015 सर्टिफाईड असलेली पंचक्रोशीतील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.
नोव्हेंबर 2023 पर्यंत इतर सर्वसामान्य ग्रामपंचायती प्रमाणे ही ग्रामपंचायत कार्यरत होती परंतु ऐतिहासिक पहिल्याच सार्वत्रिक लोकनियुक्त सरपंच पदी उच्चशिक्षित,समाजाशी नाळ असलेल्या,विविध पायाभूत योजणांचा अभ्यास असलेल्या सौ.साक्षी संतोष साठे यांना गावकर्यांनी भरघोस मतांनी निवडून दिले आणि तेथून खऱ्या अर्थाने गावाच्या सर्वांगीण विकासाला रंग येऊन गाव तालुका आणि जिल्ह्यात एका चांगल्या प्रतिमेसाठी चर्चेला येऊ लागला.
स्वतःसॊबत गावकर्यांनी निवडून दिलेल्या कारकारिणी ला विश्वासात घेऊन सरपंच साक्षी संतोष साठे यांनी अनेकविध नावीन्यपूर्ण संकल्पना राबवायला सुरवात केली जसे कि “झाड लावा, झाड जगवा आणि घरपट्टीत सवलत मिळवा” हा ठराव करून संपूर्ण जिल्ह्याला चकित करून गावाला पर्यावरण पूरक बनवण्याचा संकल्प करून एक आगळे वेगळे पाऊल टाकले.
अबिटघर गाव तसे शैक्षणिक व सांस्कृतिक, अध्यात्मिक व उद्योग तसेच शेतपूरक ही बहुआयामी ओळख असलेले गाव पण या नव्याने तयार झालेल्या कार्यकारिणीचे नेतृत्व करताना सरपंच साक्षी साठे यांनी यावर कळस चढविताना गावातील प्रत्येक सामाजिक घटकाच्या सन्मानार्थ त्यांना झेंडा वंदनाचा मान देणे,नवनवीन उपक्रम राबवून सर्वांचा आदर राखला जाईल याची काळजी घेणे.सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव, अखंड हरीनाम सप्ताह, शिवजयंती,भीमजयंती,हनुमान जयंती,महिलांचे हळदीकुंकू,विविध प्रशिक्षणे आयोजित करून समाजहीता साठी काम करणारी ग्रामपंचायत म्हणून आबिटघर मागील तीन वर्षात नावारूपाला आली आहे.
शैक्षणिक संकुले अर्थात ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या शाळांना आर्थिक पाठबळ देऊन जिप शाळांना अद्ययावत करणारी बहुतेक आबिटघर तालुक्यातील पहिलीच ग्रामपंचायत असेल.
विविध शासकीय योजनांचे शिबीर लावून तात्काळ दाखले देणे,अनेक शासकीय योजनांचा प्रत्येक गरजू लाभार्थी वंचित राहणार नाही याची काळजी घेतानाच अनेक पायाभूत सुविधा देणारी ग्रामपंचायत म्हणजेच अबिटघर.
नळपाणी पुरवठा,सार्वजनिक सुरक्षेसाठी पूर्ण गावाला सी.सी.टीव्हीबसवणे, विध्यार्थी सुरक्षेसाठी शाळांना देखील सीसी टीव्ही बसवणे, रस्ते, स्ट्रीट लाईट,कचरा व्यवस्थापन करण्यासाठी घंटागाडी च्या माध्यमातून कचरा संकलन,प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत करण्याचा मानस, हरितपट्टे विकसित करणारी तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत,गाव आणि प्रत्येक पाडा वस्ती वाड्या येथे सिमेंट काँक्रेटचे रस्ते,नळाद्वारे पाणी, सौर पथदिवे तसेच रुग्णसेवेसाठी स्वतःची रुग्णवाहीका वापरणारी ग्रामपंचायत म्हणून अबिटघरचे नाव या तीन वर्षात पुढे आले आहे.
सरपंच महोदया या उच्च शिक्षित असून त्यांना विकासात्मक दूरदृष्टीकोन असल्यामुळे ग्रामपंचायत अबिटघर वेगवान प्रगतीच्या दिशेने पुढे सरकत असून “एका अंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून गावाला पाणीदार ग्रामपंचायत बनवण्याचे व येथील सर्व शेतकऱ्यांना वर्षाला 2/3 पिके घेता येण्यासाठी एका मोठ्या प्रकल्पचे काम सरपंच सौ. साक्षी संतोष साठे यांच्या नियोजना खाली युद्ध पातळीवर सुरु आहे.
त्याचबरोबर येत्या काळात गावाच्या गावदेव देवस्थानाचा सन्मान,गावाच्या लौकिकात भर टाकणारी चिन्हे (कमानी वैगरे), वायफाय युक्त गाव, सार्वजनिक वाचनालयाचा कायापालट असे विविध उपक्रम प्रगतीपथावर असून, माझी वसुंधरा मध्ये भाग घेऊन आपली ओळख वाढविण्याचा मानस ग्रामपंचायतिचा आहे.

श्री. देवेंद्र फडणवीस
मा. मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे
मा. उपमुख्यमंत्री

श्रीम. सुनेत्रा अजित पवार
मा. उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार गोरे
मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री. योगेश कदम
मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश नाईक
मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)
मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

श्री.रवींद्र शिंदे
मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील
उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

श्री. वैभव भाऊराव शिंदे
गट विकास अधिकारी
पंचायत समिती वाडा

सौ. साक्षी संतोष साठे
सरपंच
ग्रामपंचायत अबिटघर

सौ. धनश्री दयानंद पाटील
उपसरपंच
ग्रामपंचायत अबिटघर

श्री. संजय शंकर पाटील
ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत अबिटघर
चालू योजना







