गॅलरी आणि मीडिया

ग्रामपंचायत अबिटघर यांच्या वतीने शिवछत्रपतीना मानाचा मुजरा…!
अबिटघर सरपंच साक्षी संतोष साठे यांच्या वतीने आज शिवजयंतीच्या औचित्याने आज ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी शिवचरित्राचा जागर मांडून ग्रामपंचायत सदस्य कुलदीप पाटील यांनी उपस्थितांचे प्रबोधन केले.
शिवाजी महाराज्यांच्या चरित्र्याचा सर्वांनी अंगीकार करून 1 टक्का जरी आचरणात आणला तरी ग्रामपंचायत अबिटघर मध्ये सुराज्य निर्माण होईल असा आशावाद सरपंच साक्षी साठे यांनी व्यक्त केला.
या शुभप्रसंगी उपसरपंच धनश्री दयानंद पाटील,ग्रामपंचायत अधिकारी संजय शंकर पाटील व कर्मचारी वृंद उपस्थित होते.